Wednesday, 24 June 2020

Book Review By SKEducatoR


रिच डॅड पुअर डॅड.... तुम्ही वाचलं आहे का? नसेल वाचले तर एकदा आवश्यक वाचा.... एक माझा विद्यार्थ्यांनी मला विचारले सर तुम्ही हे पुस्तक वाचले का?.......                                              

जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्दल विचार करण्याच्या पद्धतीला रॉबर्ट कियासाकींने आव्हान दिले व ती बदलून टाकली. या पुस्तकाचे अनेक भाषेत अनुवाद देखील झालेले आहेत. अभिजित थिटे यांनी सदर पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील केला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेतील एक वाक्य मनाला खूप भावते ते म्हणजे , ' आर्थिक साक्षरता आणि पैशांबाबतचे ज्ञान असल्या शिवाय आपण बदलत्या जगाला तोंड देऊच शकत नाही'.... रोबोट कियोसाकी यांनी सांगितल्यानुसार पुस्तकाची सुरुवात ही " मला दोन वडील होते. एक श्रीमंत , तर एक गरीब.....या वाक्याने होते. गरीब डॅड म्हणत, माझ्या दृष्टीने पैशाला फारसे महत्त्व नाही, तर श्रीमंत डॅड म्हणत , पैसा ही शक्ती आहे. या पुस्तकात पुढील बाबींचा उहापोह करण्यात आला आहे. 
१) श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत
२) अर्थसाक्षरता कशासाठी?
३) तुमचा उद्योग ओळखा
४) करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनचे सामर्थ्य
५) श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात
६) शिकण्यासाठी काम करा पैशासाठी नको....या पुस्तकांतील काही वाक्य कायम स्वरूपी लक्षात राहतात. ती म्हणजे
१) गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात श्रीमंत जवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो.
२) श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला मालमत्ता व कर्ज यातील फरक माहीत असायला हवा.
३) मालमत्ता तुमच्या खिशात पैसे आणते.
४) श्रीमंत मालमत्ता विकत घेतात गरिबांना फक्त खर्च असतात.
५) तुम्ही मालमत्ते भोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचे मालक असावं.
....हे पुस्तक आपल्याला पैशाबांबतचा नवा दृष्टिकोन नकळत पणे देऊन जात. आपणही आपल्या मालमत्ता व कर्ज यांची व्याख्या करू लागतो. आपली आर्थिक गणिते सक्षम करण्यासाठी हे पुस्तक असे माझे मत आहे. चला तर मग एकदा आवश्यक वाचा.... रॉबर्ट टी कियोसाकी यांचे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक....

No comments:

Post a Comment