Sunday, 28 June 2020

Voice Typing कसे कराल ?

  मराठी टाईपींग (Typing) करता येत नाही?....  तरीही तुम्ही मराठी टाईपींग करू शकाल ? ते कसे.....

समजा तुम्हाला एखादे महत्त्वाचे पत्र टाईप करावयाचे आहे. आता प्रश्न असा आहे की, तुम्हाला मराठी भाषेत टंकलेखन करता येत नाही. तेव्हा अनेकदा आपण एक पत्र टाईप करण्यासाठी दिवसभराचा वेळ घालतो किंवा कुणाला तरी सांगुन ते टाईप करून घेतो. तुमच्या असेही लक्षात येते की, टाईपिंग     करणा-याने अनेक चुका केल्या आहेत. या मुळे अनेकदा आपल्याला खेद वाटतो की, आपल्याला टाईपिंग का येत नाही. अनेकदा आपण टाईपींग करणा-या व्यक्तिकडून एक पेज साठी 30 ते 40 रूपये दयावे लागतात. थोडक्यात काय तर वेळ आणि पैसे दोन्ही देउन आपले काम मनासारखे होतच नाही. यावर एक उपाय म्हणजे Voice Typing हा होय. म्हणजे काय तर बोलून टाईपींग करणे होय.

तुम्ही जे बोलात ते संगणक आपोआप टाईप करतो. वा छानच की ते कसे ....
Voice Typing कसे कराल ?
  • तुमच्या संगणकावर अथवा लॅपटॉवर गुगल सर्च बार मध्ये Google Doc शोधा. Google Doc म्हणजे आपल्या वर्ड फाईल प्रमाणे पण Online Document होय.
  • ओपन झालेल्या विंडो मध्ये Go to Google Doc हा पर्याय निवडा.
  • एक नवीन Blank फाईल ओपन करा. ही फाईल आपल्या वर्ड फाईल प्रमाणेच दिसते
  • टूलबार मधील हा Tools पर्याय निवडा. या पर्यायामधील Voice Typing  ची निवड करा.
  • त्यांनतर भाषा निवड करून मराठी भाषा निवडा
  • Speak Now या बटनावर क्लिंक करा. आता तुम्ही मराठी टायपिंग करण्यासाठी तयार आहात.

तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील डाउललोड करून तिथे देखील मराठी टायपींग करू शकता. अडचण येत असल्यास सोबत जोडलेले  चे अनुकरण करा. मात्र तुमच्या कडे यासाठी लॅपटाप वा संगणक इंटरनेट जोडणीसह आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. मराठी टायपींग बोलून करतांना मात्र हेड फोनचा वापर करा आणि स्पष्टपणे मोठया आवाजात बोला तुम्ही जसे बोलता त्या प्रमाणे संगणक स्वत: टाईपिंग करत असेल. या प्रमाणे तुमचा वेळ पैसे दोन्ही वाचवू शकाल. सुरवातील थोडे अवघड वाटेल पण सरावने तुम्ही हजारो पाने मराठीमध्ये टाईप कराल.


Saturday, 27 June 2020

ई पुस्तके ! फ़्री पुस्तके !! मराठी पुस्तके!


 ई पुस्तके ! फ़्री पुस्तके !! मराठी पुस्तके!
मोफत मराठी पुस्तके ! मोफ़त मराठी ई बुक्स !!
काय सांगताय विश्वास बसत नाही पण हे खरे आहे.  
ई साहित्य प्रतिष्ठानच्या काही उपक्रमशील मंडळीने मराठीवाचकांसाठी हा उपक्रम राबविला आहे.  ई-साहित्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाचता येतील अशी पुस्तके. या वेबसाईटवर
हजारो पुस्तके! फ़क्त एक क्लिक उपलब्ध आहेत. कथा कादबरी काव्य बालसाहित्य अध्यात्म आणि बरेच काही इत्यादी सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.
 आणि तुमच्या आवडीच्या पुस्तकावर पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा पुस्तक हजर....एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स... इतके सोपे आहे सर्व ई साहित्य प्रतिष्ठान दर महिन्याला पुस्तकं प्रकाशित करतं. सर्व पुस्तके विनामुल्य मिळतात. तुम्ही तुमचा ईमेल आयडी दिला तर तुम्हाला पुस्तके देखील पाठविली जातात. तेही मराठीच. मग वाट का बघता ? वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देत आहे. खालील काही निवडक पुस्तकांची यादी देत आहे ती सर्व तुम्ही मोफत मिळवून वाचू शकता.
Ø  साने गुरूजीचे श्यामची आई हे पुस्तक
Ø  डॉ बाबासाहेब आंबेडकराचे जाती प्रथेचे निर्मलन हे पुस्तक
Ø  महात्मा गांधीचे संत्याचे प्रयोग आत्मकथा
Ø  महाराष्ट्र माझा दुर्ग भम्रण सर्व किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके
Ø  गीता रहस्य
Ø  संतसाहित्या वरील विविध पुस्तके
Ø  फोटोग्राफीचे तंत्र आणि मंत्र समजावणार्‍या साध्या सोप्या भाषेतल्या पुस्तिकांचा संच
Ø  अध्यात्माच्या अभ्यासासाठी अध्यात्मिक पुस्तके
Ø  वात्स्यायनचे कामसूत्र

मागील काही वर्षात प्रतिष्ठानाव्दारे प्रकाशित करण्यात आलेल्या विविध पुस्तकांची यादीसदर वेबसाईटवर उपलब्ध देण्यात आली आहे. यादी तून तूम्ही पाहिजे ते पुस्तक निवडून वाचू शकता. जर शक्य असेल तर तुम्ही सदरील वेबसाईटला देणगी देवु शकता. तसेच तुमचे पुस्तक प्रकाशनासाठी साहित्य प्रतिष्ठानाकडे पाठवू शकता. चला तर मग सदर वेबसाईटला भेट दया पाहिजे ते पुस्तक डाउनलोड करा. वाचन करा. कारण वाचाल तर वाचाल....तर तुम्ही वाचतायना.....नक्की वाचा. तसेच सदर लेखाची उपयुक्त आम्हाला करायला विसरू नका.
@ by SKEducatoR-

संदर्भ साहित्य प्रतिष्ठान : http://www.esahity.com/