राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तिमत्त्व विकासाचे खुले
व्यासपीठ आहे. समाजातील युवकांना सामाजिकतेचे भान प्राप्त करून समाजाला उन्नत
करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत आहे. युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता
त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंना फुलवण्यासाठी राष्ट्रीय सेवा
योजना सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थी विकास ते राष्ट्रविकास या व्यापक स्तरावर
योजना कार्य करते. ग्राम ते राष्ट्रस्तरावर अनेक युवक या योजनेत सहभागी होऊन देश
विकासास हातभार लावत आहेत. छोटया प्रश्नांपासून ते मोठया देश पातळीवर प्रश्नांपर्यंत
सर्वच प्रश्न सोडविण्याचे उत्तर राष्ट्रीय सेवा योजनेकडे आहे. राष्ट्रीय सेवा
योजनेच्या माध्यमातून निस्वार्थपणे समाजकार्य व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले
जातात. समाजाच्या सेवेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साकारण्यासाठी तसेच
शिक्षणाद्वारे समाजसेवा घडविण्यासाठी ही सेवा खुप महत्त्वाची आहे. आज या योजनेत
सुमारे ३२ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी देश भरातून सदर योजनेत सहभागी आहेत. अनेक
युवक आणि युवतींमध्ये राष्ट्रविकासाप्रतीची नवी उमेद दिली आहे. जनसामान्यांच्या मनात
योजनेविषयी खूप आदरभाव तयार करण्यास सदर योजना यशस्वी झाल्याचे आपणास दिसून येते.
एकदा का कोणताही स्वयंसेवक विद्यार्थी या योजनेत सहभागी झाला ही तो आयुष्यभर या
योजनेशी नकळतपणे जोडला जातो आणि आयुष्यभर मी एनएसएसचा स्वयंसेवक आहे हे अभिमानाने
सांगतो.

No comments:
Post a Comment